पावसाळ्यातील अति अति अवघड श्री. राजगड ते श्री. रायगड मोहीम सिंगापूर नाल मार्गे
आज २३ जून २०२१ अर्थात तिथीनुसार जेष्ठशुद्ध त्रयोदशी शिव राज्याभिषेक शक ३४८ अर्थात हिंदू साम्राज्य दिन. आजच्याच दिवशी इस्लामी सत्तेच्या छाताडावर पाय देऊन हिंदवी स्वराज्यची निर्मिती करून हिंदूचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले.
शिव राज्याभिषेक किल्ले श्री. रायगड
मंगेश केनी आणि इतर धारकरी
आम्ही गड चडताना खूप पाऊस सुरू होता आणि ढग पण खूपच वाहत होते. संपूर्ण गडाला धुक्याची चादर लपेटलेली होती. पावसाळ्यात गडावर जाण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. गडावर तुरळक लोक गड दर्शनाला आले होते. संपूर्ण गडाने नुकतीच हरवी शाल पांघरली होती. त्यामुळे गडाचे मनमोहक दृश्य पाहण्यात अद्भुत असा आनंद मिळत होता. आम्ही जसेजसे गड चढाई करत होतो, अगदी तसेतसे इतिहासातील घटनांचे स्मरण होत होते. त्यामुळे कधी मन भरून यायचे तर कधी त्या काळी घडलेल्या घटनांनी आणि पराक्रमाने उर भरून यायचा.
बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा
बालेकिल्ला चढाई करायची म्हणजे मन खंबीर लागते. ती चढाई म्हणजे अगदी सरळ चढावे लागते आहे. त्यामुळे बालेकिल्ला पाहताना तो जणू बालेकिल्ला आभाळाला टेकून खुणावतो आहे, असे वाटते. आणि वर पाहून डोळे गरकन फिरतात. पण धारकरी म्हटल म्हणजे अशा चढाई करणे आमच्या अंगवळणी पडलेले असते. अवघड चढाईला भिणारा असेल तर तो धारकरी कसला?
पश्चिम बुरूज
आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी राजगड उतरलो आणि मग पुढील मार्गाकडे खूच केली. अनेक ठिकाणी नुकताच पाऊस पडून गेला होता. त्यामुळे धरती आणि सह्याद्री पूर्ण हिरवागार झाला होता.
एकलगाव पठार
एकलगाव आणि पठार आम्ही गाठले होते. त्या नंतर आता मोहारी... मग रायलिंग पठारकडे कूच करत निघालो. आम्ही भर पावसात रायलिंग गाठले. रायलिंग पठार येथे आम्ही विश्रांती घेतली. जेवण करून झाल्यावर आणि तिथून दिसणारा लिंगाणा आणि मागे धुक्यात दिसणारा किल्ले श्री.रायगड आम्ही डोळ्यांत साठविला आणि आमच्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून घेतला.
धुक्यातील लिंगणा
रायलिंग पठार आम्ही आता मागे टाकले होते. रायलिंग पठार नंतर आम्ही सिंगापूर नाळेतून कोकणात उतरनार होतो. हा प्रवास पावसाळ्यात करणे म्हणजे अति साहस आणि धाडस घेऊनच आम्ही कूच केली.
पण कृपया पावसाळ्यात कोणीही सिंगापूर नाळ उतरण्याचा प्रयत्न करू नये... अनुभवावरून...
सिंगापूर नाळ
सिंगापूर नाळचा निसरडा भाग
आम्ही पुढे सिंगापूर नाळेतून खाली उतरलो आणि दापोली गावातून श्री. रायगडाकडे प्रस्थान केले. रायगडकडे जाताना वाळण कुंड लागतं. बाजुलाच श्री. वरदायिनी मातेचं स्थान आहे. कुंड ओलांडण्यासाठी लोखंडी पूल आहे. ह्या कुंडच्या भागात गेल्यावर आपण हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड मध्ये आल्यासारखं वाटतं...इतका नितांत सुंदर आणि स्वच्छ परिसर हा वृक्ष राजीणी नटलेला आहे.
वाळण कुंड
अनेकदा ऐकले होते की जगदीश्वर मंदिरातील मूळ शिवलिंग जे महाराजांनी स्वतः स्थापित केलं होतं. नंतर रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर हे शिवलिंग सुरक्षेच्या कारणास्तव वारंगी या गावात स्थापित केलं.
शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच द्वादशी ज्यादिवशी महाराजांनी जगदीश्वरपुजन केलं त्याच तिथीला त्या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं... किती भाग्यवान म्हणायचे....
वारंगी येथील शिवमंदिर
वारंगी शिवलिंग मंदिर कळस
1 Comments
very good daad
ReplyDeletePOLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH